"शेतकऱ्यांनी आपली जमीन रापायची. योग्य वेळी कसायची.  पेरणी करायची आणि आपल्या शेतात फक्त २० मिनिटे दररोज ‘ओम रोम जुम साहा’ या मंत्राचा जप करायचा.  पाऊस कमी पडो की जास्त. खत असो वा नसो. आणि कीटकनाशकांची तर गरजच नाही. इमानेइतबारे, ध्यानधारणेद्वारे हा मंत्र तेवढा जपायचा. तोदेखील बी रुजेपर्यंत. की झाले. पीक कसे भराभर वाढते. या मंत्राच्या उच्चाराने विश्वाच्या पसाऱ्यात, आसमंतात दडलेली सकारात्मक ऊर्जा पिकाकडे वळते. जसे की शंकराने तिसरा नेत्र उघडल्यावर ज्याप्रमाणे दुष्टशक्तींचा विनाश होऊन सुष्ट शक्तींना ऊर्जा प्राप्त होते तद्वत या मंत्राच्या उच्चाराने अशा लहरी पृथ्वीच्या गाभ्यातून तयार होतात की त्यामुळे समोरच्या रोपाच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. पीक हां हां म्हणता,  किंवा न म्हणताही   भराभर मोठे होते. मंत्रपठण दररोज करायचे. म्हणजे दररोजच अनुकूल स्थिती. {श्रीमती उषा सरदेसाई -गोव्याच्या कृषिमंत्र्यांच्या पत्नी आणि स्वतः विजय सरदेसाई)