ख्रिश्चन समाजाने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नव्हता. (बोरीवली विधानसभा क्षेत्रात ‘मैदान-उद्यान सम्राट’ अशी ख्याती असलेले व २०१४च्या निवडणुकीत लोकसभेत निवडून गेलेले भाजपाचे गोपाळ शेट्टी)

प्रतिक्रिया (१) :
गोपाळ शेट्टी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यानेच असे विधान केल्याने पक्षाच्या अडचणीत वाढ झाली. भाजपाचे मुंबईतील अध्यक्ष आशिष शेलार यांनी शेट्टी यांना हे वादग्रस्त विधान मागे घेण्यास सांगितले होते. शेट्टींचे ते वैयक्तिक मत असून भाजपा त्यांच्या मताशी सहमत नाही, आम्ही ख्रिश्चन समाजाचा आदर करतो, असे शेलार यांनी सांगितले होते. दुसरीकडे ख्रिश्चन समाजातील दोघांनी या प्रकरणी शेट्टींविरोधात पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.

मुंबईतील पक्षनेतृत्वाने खडे बोल सुनावल्याने नाराज झालेल्या गोपाळ शेट्टी यांनी थेट राजीनाम्याचा इशारा दिला आहे. मला पदापेक्षा भाषणस्वातंत्र्य महत्त्वाचे असून मी माझ्या विधानांवर ठाम आहे. मी स्वत:च राजीनामा देण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिय (२) :
ख्रिश्चनांचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हते असे विधान आज एका मंत्र्याने केले. या मंत्र्याला आपल्या विधानाबद्दल स्वतःची लाज वाटायला हवी. कारण, काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले आहे आणि त्यामध्ये ख्रिश्चन असलेल्या अॅनी बेझंट यांचाही वाटा होता. (शरद पवार)