चाल - दशरथा, घे हे पायस दान. राग - भीमपलासी, ताल - कहरवा
निपुत्रिका, घे हे आमरस दान, आमरस दान
तव यत्नांची होय सांगता, तृप्त जाहली, बाग कामदा
प्रसन्न झाले, मुला तुझ्या वर, भाटेमाय भगवान
निपुत्रिका, घे हे आमरस दान, आमरस दान
गुरुजी भिडेंची आज्ञा म्हणूनी, आलो मी हा आम्र घेऊनी
या दानासी या दानाहुन, अन्य नसे उपमान
निपुत्रिका, घे हे आमरस दान, आमरस दान
करात घे हा दुर्लभ्य आंबा, दोघे खावा गर यातला
कामधेनुच्या दुग्धाहुनही, ओज याचे बलवान
निपुत्रिका, घे हे आमरस दान, आमरस दान
पती-पत्नी करी आंबा भक्षण, उदरी होईल वंशा रोपण
पत्नी पोटी, जन्मा येतिल, पुत्र अनेक महान
निपुत्रिका, घे हे आमरस दान, आमरस दान
अविश्वास का तुझ्या लोचने, धिक्कारिसी का माझी वचने.
आले पोलिस, पकडाया मज, होतो अंतर्धान
निपुत्रिका, घे हे आमरस दान, आमरस दान