संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता ( राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड)

प्रतिक्रिया :  यावरून वाद निर्माण झाल्यावर त्यांनी आपले वक्तव्य फेसबुकवरून हटवले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने निषेध नोंदवला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तुकाराम महाराजांबाबत असे बोलण्याचे धाडस त्यांनी केलेच कसे? त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे अशा प्रतिक्रिया वारकरी संप्रदायाने नोंदवल्या आहेत.