दुधाला लिटरमागे पाच रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी
संघटनेने रस्त्यावर दूध ओतून सुरू केलेल्या आंदोलनाची राज्याचे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत
यांनी खिल्ली उडवली आहे. 'हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी नसून निवडणुकांसाठी आहे
आणि रस्त्यावर ओतल्या जाणाऱ्या दुधात किती पाणी हे मला चांगलं माहीत आहे,' (सदाभाऊ खोत)