मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे देशात दहशतवाद, बलात्कार व हत्यांची संख्या वाढत असल्याचा आरोप भाजपाचे उत्तर प्रदेशातल्या फैजाबादमधल्या आंबेडकरनगरचे आमदार हरी ओम पांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुस्लिमांच्या लोकसंख्येवर नियंत्रण राखण्यात सरकारला अपयश आलॅ तर पाकिस्तानसारखा आणखी एक देश तयार होईल आणि देशामध्ये अराजक नांदेल.
"मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे दहशतवाद, बलात्कार व हत्यांचं प्रमाण वाढत आहे. स्वातंत्र्यानंतर देशातील मुस्लीमांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली आहे," पत्रकारांशी बोलताना पांडे म्हणाले. मुस्लीम तीन चार विवाह करतात, ९-१० मुलांना जन्माला घालतात. ज्यांना शिक्षण मिळत नाही व ते शेवटी बेरोजगार राहतात. परिणामी देशात अराजक निर्माण होईल. आता शरीया कायद्याची मागणी होत असून नंतर पाकिस्तानची मागणी करण्यात येईल," (हरी ओम पांडे).
त्यांची लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासंदर्भात संसदेत विधेयक आणायला हवे अशी मागणी पांडे यांनी केली असून जर देश वाचवायचा असेल तर असे विधेयक संसदेत मंजूर होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पांडे यांना चार मुले आहेत.