चांगलं लिहिलंय.  जे सांगितलं आहे, ते शब्दांत मांडणं खरंच अवघड आहे. त्यामुळे लिहिल्याबद्दल धन्यवाद. 

ज्या क्षणी जे हवं असतं, ते त्या क्षणी मिळालं की आनंद होतो...  पण मग लगेचच पुढची गोष्ट हवी, ही इच्छा होते, की त्यामागे धावणे सुरु.... 

आहे हा क्षण असाच आहे, आणि तो अटळ आहे, हे समजून, उमजून राहायला जर जमलं, तर प्रत्येक क्षणी त्या आनंदाच्या स्थितीची अनुभूती मिळू शकेल, हे ऐकलंय. पण समजतं, कळतं, पण उमगत, वळत नाही, अशीच  माझी बऱ्याच वेळा परिस्थिती असते!