काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे टॅक्स प्रकरणात अडकले आहेत. त्यामुळे जे नैराश्य त्यांना आले आहे त्यातून ते केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. असोसिएट जनरलची ५ हजार कोटींची मालमत्ता यंग इंडियाने ५० लाखात खरेदी केली.  यंग इंडियाने ५० लाख देऊन ९० कोटींचे कर्ज सुरक्षित केले.  आता राहुल गांधी यांना ५ हजार कोटींच्या मालमत्तेवर १५० कोटी इतका टॅक्स भरावा लागणार आहे,  त्यामुळे ते नैराश्यातून सरकारवर आरोप करत सुटले आहेत... (भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद)