लव्ह ट्रँगलसाठी 'प्रेमाचा त्रिकोण' हाच रूढ मराठी शब्द आहे. दुसरा शोधायची गरज नाही.
पण या कवितेत आणखी एका दुरुस्तीची गरज आहे. प्रमाण मराठी शब्दाऐवजी जेव्हा बोली भाषेतील शब्द वापरायचे असतात, तेव्हा अनुस्वार गाळून चालत नाही.
उदा० भाजीच टॉपिंग, आपल काय, कधी झाडाच या शब्दांमध्ये अनुक्रमे 'च, ल, आणि 'च' या अक्षरांवरील अनुस्वार गाळायला नको होते. या चुका मनोगतच्या शुद्धिचिकित्सकालाही सापडत नाहीत.