अखिलेश यादव यांनी भगवान विष्णूच्या नावाचे एक खूप मोठे शहर बसवून, त्यात अयोध्येला राम मंदिर बांधायच्या आधी एक विष्णुमंदिर बांधायची घोषणा केली. ते म्हणाले : "इटवाह येथील लायन सफरीजवळ आणि चंबळ नदीजवळच्या डोंगराळ भागात खूप जमीन आहे. पैकी दोन हजार एकर जमिनीवर हे शहर बांधले जाईल. हे विष्णुमंदिर कांबोडियामधील आंग्कोर वाटच्या मंदिराची प्रतिकृती असेल. त्या मंदिराच्या अभ्यासासाठी आम्ही तज्ज्ञांचा एक गट कांबोडियाला पाठवणार आहोत. आंग्कोर वाटचे मंदिर मूळ विष्णूचे होते, ते बौद्धांनी त्यांचे केले; येथे असे होणार नाही. आमच्या पक्षाला निवडून दिलेत तरच हे शहर आणि मंदिर बनेल. या मंदिराजवळ वाटल्यास रामाचे देऊळही बांधता येईल. ....
(उत्तर प्रदेशचे-समाजवादी पक्षाचे- माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव)
प्रतिक्रिया : मंदिर बांधाल हो, पण त्या मंदिरासाठी लखनौच्या सरकारी निवासस्थानामधून चोरलेले नळ वापरू नका.