काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मानसिकदृष्ट्या अस्थिर असून, त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या पक्षातील नेते हैराण झाले आहेत.
राहुल गांधी यांनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूडशी करताना १९८४मध्ये झालेल्या शीख दंगलीमध्य काँग्रेस सहभागी नव्हती, असे म्हटले आहे. 'राहुल गांधी काय बोलतात आणि काय करतात हे सर्वांनीच संसदेत पाहिले आहे. १९८४ मध्ये झालेल्या शीख दंगलीमध्ये काँग्रेस सहभागी नव्हती हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. जेवढ्या नागरिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते सर्व काँग्रेसचे नेते आहेत. यामधूनच गांधी हे मानसिकदृष्या आजारी असल्याचे दिसते. देवाला प्रार्थना करते की त्यांना चांगली सुद्बुद्धी दे.'
'मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गाधी व राजीव गांधी यांनी
काँग्रेसची धुरा सांभाळली. परंतु, आज एक कमकुवत व्यक्ती पक्ष चालवत आहे.
१९८४मध्ये काय झाले हे राहुल गांधी यांना माहीत नाही. त्यामुळे काय बोलावे
हे त्यांना कळत नाही,' (केंद्रीय
मंत्री उमा भारती)
प्रतिक्रिया : १. पण हे त्यांच्या मातोश्रींना कळत नाही.