३४ व्या लेखात समर्थांच्या या ओव्या तुम्हीच उधृत केल्या आहेत : 

रघुनाथभजने ज्ञान जाले । रघुनाथभजने महत्त्व वाढले ।
म्हणौनिया तुवां केले । पाहिजे आधी ॥


मी तर सुरुवातीपासनंच म्हणतोयं की राम ही कवी कल्पना आहे.   निराकाराचा उलगडा व्हायला रघुभजनाचा शून्य उपयोग आहे.

आता गाडी रुळावर आलेली दिसते. तुम्ही ज्या शेवटच्या श्लोकांचा सविस्तर अर्थ लिहीला नाही, तो असा आहे :

देवपण आहे निर्गुण । देवपदी अनन्यपण ।
हाची अर्थ पाहता पूर्ण । समाधान बाणे ॥ 

निराकारच सत्य आहे आणि ते एकच आहे हा उलगडा समाधानाप्रत नेतो.

देहीच विदेह होणे । करून काहीच न करणे ।
जीवन्मुक्तांची  लक्षणे । जीवन्मुक्त जाणे ॥ 

निराकारत्वाचा उलगडा विदेहस्थितीला नेतो आणि ती स्थिती कायम अकर्ता आहे. अशी व्यक्ती स्वच्छंद होते  ( हे मी मागच्या लेखावरच्या प्रतिसादातच म्हटलं होते )

येरवी हे खरे न वटे । अनुमानेची संदेह वाटे ।
संदेहाचे मूळ तुटे । सद्गुरूवचने ॥ 

आपण कधीच काही केलं नाही हा सिद्धाचा अनुभव आहे पण इतरांना ते खरं वाटत नाही. अर्थात, समर्थ म्हणतात तसं अज्ञानाचं मूळ गुरुवचनानं कधीही तुटत नाही, ते स्वरुपाचा बोध झाल्यामुळे तुटतं.