दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये केला होता. त्यानंतर भाजपा आणि पंजाबमधील अकाली दलाने या मुद्यावरून काँग्रेसला घेरले आहे. शीख विरोधी दंगलीत काँग्रेसचा सक्रिय सहभाग होता असा आरोप केला जातो. दरम्यान, दिल्लीत अनेक ठिकाणी ‘राजीव गांधी द फादर ऑफ मॉब लिंचिंग’ असा आशय असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. (होर्डिंग्ज लावणारे भाजपाचे दिल्लीचे प्रवक्ते तेजिंदरपालसिंग बग्गा )