सचिन यांचं ‘आमची मुंबई : द मुंबई अँथम’ या नावानं एक गाणं यूट्यूबवर अपलोड
करण्यात आले आहे. परंतु, 'महागुरूं'चा हा नवा 'अवतार' महाराष्ट्राला फारसा
भावलेला दिसत नाही. त्यामुळे सचिन पिळगावकरांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल
करण्यात आलाय.
‘आमची मुंबई : द मुंबई अँथम’ या नावाचे एक गाणे यूट्यूबवर अपलोड करण्यात
आलंय. परंतु, 'महागुरूं'चा हा नवा 'अवतार' महाराष्ट्राला फारसा भावलेला
दिसत नाही. त्यामुळे सचिन पिळगावकरांना सोशल मीडियावर तुफान ट्रोल करण्यात
आले आहे.
मुंबईचे 'स्पिरिट' सेलिब्रेट करण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं
असल्याचा दावा निर्माता आणि दिग्दर्शकांनी केला आहे. परंतु, नेटकऱ्यांनी
मात्र या गाण्याची खिल्ली उडवत यूट्यूबच्या कमेंटबॉक्समध्ये महागुरूंनाच
उपदेशाचे डोस पाजले आहेत.
ट्रोलर म्हणतात...
'हे गाणे ऐकल्यावर मुंबई सोडून मी केरळला जातोय'..... 'या आपत्तीसाठीसुद्धा रिलीफ फंड चालू करा प्लीज..'
'यांच्या असल्या वागण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला आलेला सुवर्णकाळ जाऊन परत तांब्या-पितळेचे दिवस येतील'
'सचिनसाहेब पैशाची टंचाई असेल तर सांगा आम्ही निधी गोळा करतो, पण प्लीज परत असा अत्याचार करू नका'
काहींनी या गाण्याची तुलना थेट भोजपुरी गाण्याशी करत 'यापेक्षा ते भोजपुरी 'रिंकिया के पापा' हे गाणे चांगले आहे'
'हे असं वेडंबिंद्र नाचत असताना 'म्हागृचा' टोप कसा बरं पडत नसावा?
म्हागृ कोणता डिंक वापरत असावा, याबाबत संशोधन करण्याची वेळ आली आहे.'