'मुंबई अँथम' या नावाने यू-ट्युबवर झळकलेलं अत्यंत घाणेरडं, ओंगळवाणं गाणं शेमारूला मागे घ्यायला भाग पाडलंय. या 'स्पीरिट'बद्दल मुंबईकरांना सलाम!अत्यंत तोकडे कपडे घातलेली एक उघडीवाघडी ललना विचित्र अंगविक्षेप करतेय, तिच्या अवतीभवती चार-पाच तरुण डोलताहेत आणि मराठीजनांमध्ये 'महागुरू' म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर - वय आणि आपल्या प्रतिष्ठा-प्रतिमेची जाणीव न ठेवता मुंबईची अक्षरशः नाचक्की करणारं गाणं गात नाचताहेत, असा व्हिडिओ काल यू-ट्युब चॅनलवर पोस्ट झाला आणि काही तासांतच इंटरनेटवर खळबळ उडाली. कट्टर मुंबईकरांनी या व्हिडीओचे वाभाडे काढायला सुरुवात केली आणि मराठीजन महागुरूंवर तुटून पडले. ट्रॉलर्स म्हणतात. 
१.  या व्हिडिओमुळे सचिन पिळगांवकर यांनी आयुष्यभर कमवलेली सगळी इज्जत अब्रू घालवली.
२. इतकं दलिंदर गाणं यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं.३. अरे भोजपुरी गाणी पण याच्यापेक्षा भारी असतात रे.
गाणं लावलं तर घराजवळ चार पाच गाढवं जमा झाली अन व्ह्या व्ह्या करू लागली. तुम्ही खरंच महागुरू आहात.
४. सर आमच्या सोसायटीत रेकॉर्ड डान्स स्पर्धा ठेवली आहे गणपतीत. तुम्ही याल का डान्स करायला ? पण आपल्याला गाणे हेच पाहिजे बुवा. काय ते शब्द, काय ती चाल आणि तुम्ही तर निव्वळ अप्रतिम +++++++++....... 
५. सर ,कोणीही काहीही म्हणू दे पण तुम्ही असे मधेमधे व्हीडिओ बनवत रहा. एवढं कोणंच हसवत नाही हो....या दगदगीच्या मुंबईच्या जीवनात तेव्हढाच विरंगुळा.
६. सर ! तुमचे शिष्य असलेल्या सर्व प्रेक्षकांनी व्हिडिओ पाहिला आणि वाट्टेल ते कंमेंट्स करून तुमची खिचाई करत आहेत. पण मला व्हिडीओ पाहायला नाही मिळाले. प्लिज प्लिज सर तो निरागस, सभ्य, सुसंस्कृत व्हिडीओ परत अपलोड करा. मला ही पाहुद्या. त्यात तुम्ही पंचवीस वर्षाचे दिसता अशी माझी मैत्रीण सांगत होती.अय्या, खरचं की काssय ! मला व्हिडिओ दाखवा..दाखवा..दाखवा. दाखवा
७. पुणे आणि मुबंई म्हणजे, दोन बहिणी. दोन्ही देखण्या.  पण आज तुम्ही, "मुंबई anthem" बनवून मुबंईचा जणू मेकअप केला आहे , ती जास्त सुंदर दिसते आहे , अशा प्रकारची एक "पुणे anthem" देखील बनवावी अशी मी आपणास विनंती करतो !
८. सर तुमच्या भावना मी समजू शकतो सर. आज कित्येक जणांशी मी भांडलो सर की जसं सिनेमात दाखवतात तसं सरबतातुन गुंगीचे औषध पाजून तुम्हाला गाफील ठेऊन हा व्हिडीओ काढला आहे.पण गाण्यात तुम्ही जे "लेले लेले" असा काही तरी म्हणल्यामुळे माझा लेले नावाचा मित्र जाम नाराज झाला. त्याचा व्हीडिओ वर काहीच आक्षेप न्हवता. मग मी त्याला समजावलं की "गाणं म्हणताना तुम्ही कान बंद केले होते"
९. मी हॉस्पिटल मध्ये एका पेशंट ला एनिमा द्यायचं सुचवलं होतं,पण हा व्हिडीओ पाहून तो मोकळा झाला..धन्यवाद म्हागृ..
१०. सर तुमचे मानस पुत्र आणि मराठी चे शाहरुख खान..एकमेव सुपर स्टार श्रीमान श्रीयुत स्वप्निल जोशी यांना ही असले च पुणे एंथम काढण्या साठी लाख मोलाचे मार्गदर्शन करावे. आता जास्त दिवस आम्ही वाट बघू शकत नाही
११. वयाच्या सातव्या वर्षी 'डायरेक्टर' बनण्याचे स्वप्न पाहिले तर, त्याची निर्मिती ही अशी होते. सॅल्युट करेंगे सॅल्युट कर..
१२. आम्हा लेट लतीफ लोकांना या व्हिडीओ ची कुणकुण लागेपर्यंत हा व्हिडीओ गायब झाला ...
याला काय अर्थय ... हे बरोबर नाही ..
सर सदर व्हिडीओ पुन्हा एकदा अपलोड करावा ही विनंती ..
१३.
भावा गळ्यात इतकं जबरदस्त पोटेन्शियल असतांना भलत्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस राजा. लोकांना अवधूत गुप्तेची गाणी छपरी आहेत असं वाटत असताना अवधूत गुप्ते काय चीज आहे हे सांगणारे आमच्या सारखे लोक आहेत अजूनही त्यांची कदर कर. झेंडा, मोरया गाजला म्हणून घाईत ढाबा भटिंडा, एकटा तारा, आणि कान्हा काढून पुढे काय मिळवलं? सारेगमप मध्ये कमावलेला तोडलेला मित्र नवा सूर गमावून बसला ओव्हरआकटिंग मुळे. नसतं ओव्हर एक्स्प्रेसिव्ह वाढीवपणा केल्यावर स्वप्नील जोशी होतो लेका...! युनिक आवाज असलेला अरिजित देशाचा स्टार होतो पण युनिक आवाज असलेला अवधूत मात्र गाणं सोडून सगळं करतो. हे सगळं त्या सर्वज्ञानी सचिन सराला लव्हल्याचे परिणाम आहेत. एकावर फोकस केला असता तर एक मराठी स्टार असता आज. लगा 14 विद्या आणि 64 कला फक्त गणपतीला येतात महागुरुला नाही. अजूनही सुधार लोंकांनी तसा कमी हेपलाय तुला.
उरला प्रश्न सचिन सरांच्या या पोस्टीचा तर त्यांनी उघड्या जखमेवर अमृतांजन लावलं आहे आणि भावा तू सांगतोय सर टायगर बाम लावा.
विसू: स्वतःमधील पोटेन्शियल विसरला असशील तर एकदा स्वतःची बंदिश, ते 4 ओळी गायलेलं रशके कमर आणि कांदेपोहे अवधूत व्हर्जन ऐक आणि मिळव परत स्वतःला. सचिन सरांना लव्ह्त राहिलास तर कठीण आहे.
१४.
खर सांगा, कॅमेऱ्यासमोर जाण्यापूर्वी इतका दर्जेदार जॉईंट कोण बनवून देत मऱ्हागरू तुम्हाला ?





आणि शेवटी : मुंबईकरांचा विजय असो; महानगरीला बदनाम करणारं 'महागुरुं'चं 'मुंबई अँथम' यू-ट्यूबवरून हटवलं!

प्रतिसाद : कसले दुष्ट लोक्स आहात रे तुम्ही सारे.... स्वतः मजा लुटली आणि आमचा एंटरटैन व्हायचा चान्स येईतो विडिओ गायब करायला लावला.... तुमचा सर्वांचा निषेध...
२. मित्राला मदत म्हणून केला व्हिडियो आणि तो फसल्यावर तसं बोलून दाखवून सगळं खापर त्याच्या डोक्यावर फोडून मोकळे! वाह रे मदत..!! असली इज्जत घालवणारी?एखादा असता खरोखर दिलदार, तर शांतपणे क्षमा मागून मोकळा झाला असता. त्या बिचाऱ्या मित्राला असं एक्स्पोज नसतं केलं.
३. काय सारवासारव आहे... दिग्दर्शनाबाबत तुम्ही बोलताय. पण गाणं तुम्हीच गायलंय, तेव्हा ते गाणं तुम्ही वाचलंही असेल त्यावरून दिशा कोणती आहे हे खरच लक्षात आलं नसेल का!
४.

५.