काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करार आणि नोटाबंदीवरुन परिषद घेत मोदी सरकारवर टीकेची
झोड उठवली होती. ते म्हणाले, "काळा पैसा पांढरा करण्यासाठी निश्चलनीकरणाचा खटाटोप
करण्यात आला. त्याने देशाचे कंबरडे मोडले. तर उद्योगपती मित्रांना मदत
करण्यासाठीच राफेल करार करण्यात आला,"
यावर भाजपा नेते व केंद्रीय मंत्री मुख्तार
अब्बास नक्वी म्हणाले : या व्यक्तीचा (राहुल गांधींचा) प्रवास
पप्पूपासून गप्पूपर्यंत झाला आहे. असत्याचा खुळखुळा वाजवत त्यांनी प्रवास
सुरू केला. आता ते असे निरर्थक विधान करणारच. गुरु घंटालला (महाघोटाळेबाजाला) दरवेळी फक्त
घोटाळाच दिसतो. त्यांना देशाचा विकास आणि सुशासन कधीच दिसणार नाही, (भाजपा नेते व केंद्रीय मंत्री मुख्तार
अब्बास नक्वी )