एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू  (राम कदम))

प्रतिसाद :  १.ज्यांच्यात कोणताही दम नाही अशा भाजपाच्या राम कदम यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान केला आहे. मुली पळवण्याची भाषा हे खुले आम करतात त्यांना सत्तेचा माज आला आहे. तुम्ही एखाद्या मुलीला हात लावून दाखवा तिने तुम्हाला पळवून पळवून हाणले नाही तर याद राखा. महाराष्ट्रात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुमच्यासारख्या जबाबदार माणसाने मुलींबाबत स्त्रियांबाबत असे वक्तव्य करणे तुम्हाला शोभते का?  महिलांबाबत असे बोलण्यास तुमची जीभ धजावतेच कशी? माफी मागितल्याशिवाय मराठवाड्यात पाऊल ठेवलेत तर तुम्हाला चपलेने हाणू . ( मराठवाड्यातील अॅड. स्वाती नखाते पाटील यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील पाच मिनिटांच्या व्हिडिओतील निरोप)

२.  राम नव्हे रावण! ‘वाह रे भाजपा सरकार, वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार.  मतदारांनो आपल्या मुलीला सांभाळा. स्वयंघोषित दयावान आणि डॅशिंग भाजपा आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहेत. जर आमदार किंवा त्यांच्या समर्थकांनी असे केले तर पोलिसांकडे तक्रार करा आणि आम्हालाही कळवा’, (मनसेच्या गणेश चुक्कल यांनी लावलेल्या पोस्टरवरील मजकूर)

३.भंजाळलेल्या जनता पार्टीचे नतद्रष्ट आमदार आपला महाराष्ट्र कोठून कोठे घेऊन जात आहेत..! अरे माठ्यांनों कुठे नेऊन ठेवलात माझा महाराष्ट्र..!!!

४.
रावणाचा अपमान होतोय....

५.
हा तोच रावण आहे जो कालपर्यंत लोकांच्या गळ्यातला ताईत होता.

६.
काळजी करू नका परत तुम्हीच त्याला निवडून आणणार आहात ...कदाचित त्याला एखादे मंत्रिपद पण मिळेल ,,किंवा मुख्यमंत्रीपद.

७.
महानालायक माणूस माफी न मागता दिलगिरी व्यक्त करीत आहे.

८. रावण कदमाला खेटराने का बदडून काढू नये?