स्मशानात वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या ५० वर्षे वयाच्या मुलाला गोत्र सांगता आले नाही . गुरुजींनी विचारल्यावर तो बावचळल्यासारखे इकडेतिकडे पाहू लागला. नशिबाने जमलेल्या लोकांत त्याला त्याची चुलत बहीण दिसली. तिने पुढे येऊन गोत्र सांगितले. गुरुजीनी बहिणीला मुलाच्या जवळ बसायला सांगितले आणि पुढच्या सगळ्या पृच्छा तिला केल्या. अखेरीस तिच्या मदतीने अंत्यसंस्कार पार पडला.
या गोष्टीलाही आता २०वर्षे झाली. आताच्या भावांना तर नाहीच, पण बहिणींनाही गोत्र सांगता येणार नाही.