गोत्र माहीत असणे सध्याच्या जगात गरजेचे आहे का ?   "सध्याच्या जगात" म्हणजे काय ? "सध्याच्या जगात" भारतात राहणारे अनेक - कदाचित बहुसंख्येने - ज्योतिष, कुंडली जुळविणे, हस्तसामुद्रिक, वास्तु, फेंगशुई, रेकी, न्यूमरॉलॉजी, राशी-रत्ने, व तत्सम अनेक थोतांडांवर विश्वास ठेवतात. घर घेताना "वास्तूशास्त्रा प्रमाणे" आहे ना विचारतात; श्राद्धपक्षात मोठी खरेदी वगैरे करीत नाहीत; . . . . . हे सगळे करीत असाल तर या कर्मकांडात कुठे तरी गोत्राची गरज पडू शकते. पण भारता बाहेर - अमेरिकन, डच, स्पॅनिश, फ्रेंच, चीनी, जपानी, मलेशियन, रशियन, थाई, इंडोनेशियन, अरब, इथोपियन, . . . . . या लोकांना हल्लीच कशाला, पूर्वी पण कधीच त्यांचे गोत्र माहीत नव्हते. किंबहुना, त्यांना गोत्रच नसते. पण त्यांचे कधीही काहीही अडले नाही.