या सिडी मधील आयट्रान्स प्रणाली वापरून काही मजकूर टाईप केल्यावर खालील ३ गोष्टी माझ्या लक्षात आल्या आहेत. येथे बरेच तज्ज्ञ असून कोणीतरी यावर प्रकाश टाकेल अशी आशा आहे.
१) व्यंजनाला स्वर जोडल्यानंतर व्यंजन मूळ रुपात (पाय मोडक्या अवस्थेत ) राहू शकत नाही. त्यामुळे खालील शब्द नुसता अशुद्ध नाही तर तो मुळात शब्दच नाही!
ग्ंगा
तर ते एक व्यंग म्हणता येईल. असे शब्द सहसा कोणत्याही इनपुट मेथडमध्ये काढता येत नाहीत. पण या आयट्रान्स प्रणालीमध्ये ते शक्य आहे. याला कॉम्प्युटर ग्लिच म्हणता येईल.
२) पूर्णविराम देताना काही विचित्र प्रकार घडताना दिसतात. 'आहे' असा शब्द टंकून लगेच पूर्णविराम द्यावा तर इंग्रजी eहे अक्षर टंकून येत आहे. त्यासाठी स्पेस देऊन मग फुल-स्टॉप दिल्यावर मागे जाऊन स्पेस काढून टाकावी लागत आहे. हा काय प्रकार आहे?
३) तिसरा मुद्दा अॅटो-करेक्ट विषयी आहे. 'करता' असा शब्द आपोआप 'कर्ता' असा बदलतो आहे. याचे कारण मला माहीत आहे. स्पेल चेकच्या सोर्स कोडमध्ये बदल करून तो शब्द काढून टाकावा लागेल. तोपर्यंत undo (ctrl + z) वापरतो आहे.