येणारी प्रत्येक निवडणूक स्वतंत्रपणे लढणार, भाजपला विदर्भात त्यांची जागा
दाखवून देणार. गडकरींच्या विरोधात तगडा उमेदवार देणार. भाजपने वैदर्भीय
जनतेचा भ्रमनिरास केला आहे’ (गजानन कीर्तीकर)
वस्तुस्थिती : गेली अनेक वर्षे सेनेचा विदर्भातील पाया भुसभुशीतच राहिला आहे. त्याला
मजबूत करण्याचे प्रयत्न सुद्धा मनापासून कुणी केले नाहीत. त्यामुळे
कीर्तीकरांची वक्तव्ये वल्गना ठरू शकतील अशातलीच समजणे भाग आहे. सध्या
विदर्भात सेनेचे चार खासदार व तेवढेच आमदार आहेत. या पक्षाचे चार खासदार
निवडून आले ते भाजपसोबतच्या युतीच्या बळावर! शिवाय तेव्हा मोदींची लाट
होती. नंतर राज्याच्या निवडणुकीत सेनेचे विदर्भात स्वतंत्रपणे लढणे चांगलेच
अंगाशी आले.