काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राफेल आणि बँकांच्या थकित कर्जाच्या प्रमाणाबाबत (एनपीए) सतत खोटे बोलत असून राहुल हे 'आचरट राजकुमार' आहेत. एक खोटे बोलायचे आणि ते
पुन्हा पुन्हा बोलायचे ही राहुल यांची रणनीती आहे. (केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली)
राफेल प्रकरणी आपण उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राहुल गांधी यांनी
कोणतेही उत्तर दिलेले नाही (जेटली)
अर्थमंत्री जेटली यांनी
एका विस्तृत फेसबुक पोस्टद्वारे राफेल आणि एनपीएप्रकरणी राहुल गांधींनी
केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. आपल्या पोस्टमध्ये जेटली म्हणतात,
'राहुल गांधी दोन खोट्या गोष्टी सांगत आहेत. एक म्हणजे राफेल करार आणि
दुसरे म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी १५ उद्योगपतींचे अडीच लाख कोटींचे कर्ज
माफ करण्याविषयी. या दोन्ही आरोपांमधील राहुल गांधींचा प्रत्येक शब्द असत्य
आहे.'
प्रतिसाद : १. राहुल गांधी हा एक उठवळ आणि बाजारबसवा माणूस आहे. त्याने केलेल्या
मूर्खपणाच्या टीकेला उत्तर देऊन भाजप नेत्यांनी विनाकारण त्याची लायकी
वाढवू नये.
२. मोदी सरकारवर राहुलजी करत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप हास्यास्पद आहेत.
1)
राफेलशी यु पी ए सरकारने तातडीने डील करून,भारतीय वायुसेनेला लढाऊ
विमानांची आत्यंतिक निकडीची गरज असताना वेळकाढूपणा करून आपली अकार्यक्षमता
दाखवून दिली.
2) मोदी सरकारने ही गरज ओळखून सर्व प्रक्रिया पूर्ण करून,
थेट फ्रान्स सरकारशी करार केला.. यु पी ए सरकारच्या कार्यकाळात ज्या बेसिक
किमतीला चर्चा झाली होती,. त्यात करार होईल तेव्हा प्रति वार्षिक ३% वाढ
गृहीत धरली गेली होती त्या हिशोबात ९% कमी किमतीत हा करार करून देशाचे पैसे
वाचवले आहेत. 3) ह्या बेसिक विमानाचे लढाऊ विमानात रूपांतरण करताना पूर्ण
भारतीय बनावटीचे ब्रम्होस क्षेपणास्त्रासह अन्य सर्व सामुग्री
बसवल्यानंतरही ह्या विमानाची किंमत सुमारे २०% एवढ्या कमी किमतीत आपल्याला
मिळत आहे ही माहिती सरकारने दिली असताना व अन्य माहिती सुरक्षेच्या
कारणास्तव सार्वजनिक न करणे असा करार भारत आणि फ्रान्स दोन्ही देशांत
झालेला असताना ती माहिती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मार्फत मिळवून शत्रू
देशांना विकली जाण्याचा धोका असताना तसे करणे अपरिपक्व नव्हे तर काय?