'नेहरू-गांधी कुटुंबाच्या
वंशावळीनुसार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती श्रीमान फिरोज हे
मुसलमान किंवा पारसी होते आणि म्हणूनच काँग्रेस तिहेरी तलाकच्या विधेयकाला
मंजुरी देत नव्हते. आता तिहेरी तलाकच्या विरोधातील वटहुकुमाबद्दल त्यांची
काय प्रतिक्रिया आहे? त्यांना आनंद झालाय की दु:ख?' (अभिनेत्री पायल रोहतगी)
प्रतिक्रिया : कोणाचा पती मुसलमान होता की अन्य जातीचा होता हे महत्त्वाचे नसून त्यांनी
देशासाठी जो त्याग केला आणि महत्त्वाची कामगिरी केली त्याचे महत्त्व असते.
परंतु तोंड रंगवून पैसे कमावण्याचा धंदा करणाऱ्या लोकांना संतांची शिकवण
माहीत नाही असे दिसते, कारण संत कबीर यांनी आपल्या दोह्यात म्हटले आहे
की मोल करो तलवार का पडा रहने दो म्यान. कुणीही उठावे आणि भाष्य करावे असा
प्रकार सध्या सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मत व्यक्त करणाऱ्या
लोकांना कुठेतरी स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो, म्हणून ते अशा प्रकारचे
विचार ते व्यक्त करतात परंतु अशा लोकांच्या विचारांना समाजात कवडीचीही
किंमत नसते