महाविद्यालयांमध्ये सर्जिकल स्ट्राइक दिन साजरा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरून वाद सुरू असतानाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राफेल खरेदीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी सैन्यावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांनी मिळून सुरक्षा दलावर १ लाख
३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मोदीजी तुम्ही देशाचा
विश्वासघात केला आहेत. तुम्ही आमच्या सैनिकांच्या रक्ताचा अपमान केला आहेत', (राहुल गांधी)