मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक असूनही या परिसरात शिवाजीचा पुतळा नाही. त्यामुळे  रेल्वेने बोरीबंदर स्टेशनच्या अठरा नंबर फलाटाबाहेर (पी.डी’मेलो परिसर) असणाऱ्या मोकळ्या जागेतच शिवाजी पुतळा बसविण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्राच्या २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराजांचा पुतळा दिवाळीआधीच बसविण्याचा प्रयत्न आहे.

बोरीबंदर स्थानकाच्या फलाट क्रमांक १८ बाहेरील रेल्वेचा परिसर ओसाड आहे. खूप मोठा परिसर असलेल्या या परिसरात मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांना सोडण्यासाठी खासगी वाहने आणि टॅक्सी येतात. हे पाहता सीएसएमटी ते कुर्ला पाचवा आणि सहावा मार्ग प्रकल्पांतर्गत सीएसएमटीच्या १८ नंबर फलाटाबाहेरील पसिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. पुतळ्याचा अष्टकोनी चौथराच दहा ते बारा फुटांचा असेल. त्यामुळे पुतळ्याची उंची जवळपास २५ फुटांपर्यंत जाईल.  पुतळा ब्रॉन्झचा असेल. पुतळा बनविण्यासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च येणार आहे. आणि यातील ४८ लाख रुपये जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌सला रेल्वेकडून उपलब्धही करण्यात आले असल्याची माहिती यावर काम करणारे अध्यापक नितीन मेस्त्री, प्रशांत इप्ते आणि विजय बोंदर यांनी दिली.

चौथऱ्यावर सर्व बाजूंनी शिवाजीचे जीवन उलगडणारे प्रसंगही दाखविले जातील. यामध्ये राज्याभिषेक, जिजाबाईची शिकवण इत्यादींचा समावेश असणार आहे.

प्रतिक्रिया : शाहू-फुले-आंबेडकर-रमाई-सावित्री यांचे असेच पुतळे उभारावेत. २०१९च्या निवडणुकांत आणखी मते मिळतील.