डिपॉझिट घेऊन ते परत करायचे नाहीत असा जर त्यांचा प्लान असेल, तर याला घोटाळा नव्हे, फसवणूक म्हणतात.
घोटाळा म्हणजे - इंग्रजीत एंबेझलमेंट. मात्र त्यांची स्कीम अशक्य व फसवणूकच आहे, असे जरूरी नाही.

तुम्ही बँकेचे व्यवसाय गणित त्यांना लागू करत आहात. म्हणून तुमचा घोटाळा होत आहे. बँकेचा नफा हा फक्त ते ठेवींवर देत असलेले व्याज दर, व ते कर्ज देतात त्याचा व्याज दर, याच्या फरकातूनच येत असतो. बँक इतर कोणताही व्यवसाय करीत नसते. म्हणून बँकेचे डिपॉझिट रेट हे त्यांच्या लोन रेट पेक्षा नेहमीच कमी असतात.  पण घरे बांधाणाऱ्या कंपनीचे तसे नाही. त्यांचा नफा तुम्हाला घर कर्ज देण्याचा दर व तुमच्या ठेवींवर ते देत असलेला दर, याच्या फरकातून येत नाही. त्यांचा नफा घरे बांधून ती विकण्याच्या धंद्यातून येतो.  पण त्यांना धंदा करयला भांडवल लागते. हे भांडवल बाजारात ज्या दराने मिळते त्यापेक्षा कमी दराने ठेवी या रूपात मिळू शकते. थोडक्यात, ते जनते कडून ९.७५% दराने ठेवी स्वीकारणार, म्हणजे ते भांडवल स्वस्तात उभे करणार. हा अगदी स्वच्छ व्यवहार आहे. आणि तुम्हाला घर कर्ज दिल्याने त्यांची घरे लौकर विकली जाणार व त्यांना त्यांचे गुंतविलेले पैसे लौकर परत मिळणार. हा पण अगदी स्वच्छ व्यवहार आहे.

थोडी शक्यता ही पण आहे कि ते देत असलेला व्याजाचा दर सांगताना ते कंपाउंडेड दर सांगत आहेत, ६ वर्षा करता ९.७५% कंपाउंडेड म्हणजे वर्षाला सिंपल इंटरेस्ट फक्त ८%. पण ते देत असलेल्या घर कर्जाचा दर मात्र ९.५% सिंपल सांगत आहेत. म्हणजे त्यांना १.५% नफा या व्यवहारात पण आहेच. मात्र मुख्य नफा व्यवसायातून होणार आहे.

तर, त्यांची स्कीम अशक्य व फसवणूकच आहे, असे जरूरी नाही. पण याचा अर्थ ती फसवणूक नाही, व तुम्हाला ठेवींवर ९.७५% परतावा मिळेल, असे पण नाही. ते त्यांची "नीयत" काय आहे या वर अवलंबून आहे. पुण्यात डीएसके १२% व्याजाने ठेवी घेत असत. आज ते तुरुंगात आहेत. पण मला नाही वाटत कि त्यांनी लोकांना फसविण्याच्या उद्देशानेच ठेवी घेतल्या होत्या. "नीयत" स्वच्छ होती. व्यवहाराचे गणित पण बरोबर होते. पुण्यात त्यांची अनेक प्रोजेक्ट चालू होती, व त्यांना १२% दराने भांडवल मिळत होते. इतर कारणांनी धंदा बुडाला व लोकांच्या ठेवी पण बुडाल्या. पण म्हणून व्यवसायाचे गणितच उरफाटे होते असे जरूरी नाही.