राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारमध्ये मंत्री असलेले शंभूसिंह यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या छायाचित्रामध्ये ते उघड्यावर लघुशंका करताना दिसत आहेत.
शंभूसिंह यांचे हे छायाचित्र व्हायरल झाल्यापासून त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका
होत आहे. त्यामाध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत
अभियानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. पण या प्रकाराचा कुठलाही
खेद वा खंत नसलेल्या या मंत्रिमहोदयांनी मात्र उघड्यावर लघुशंका करणे ही
आपली जुनी परंपरा आहे, असे सांगत आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.