उत्तर भारतीय माणूसच मुंबई-महाराष्ट्र चालवतो. दूध विकण्यापासून सर्व कामे उत्तर भारतीय माणूस करतो. तुम्ही कोणतेही क्षेत्र सांगा. त्यामध्ये उत्तर भारतीय सक्रिय आहेत. उत्तर भारतीय माणूस रिक्षा-टॅक्सी चालवतो. फळे-भाजी विकतो. बांधकाम क्षेत्रातील बहुतांश मजूर हे उत्तर भारतीय आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये उत्तर भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. हीच माणसे संपूर्ण मुंबई चालवतात. त्यांना काम बंद करायला भाग पाडू नका. जर एक दिवस उत्तर भारतीयांनी ठरवले, तर मुंबईकरांना जेवायला मिळणार नाही. त्यांनी ठरवले तर मुंबई- महाराष्ट्र ठप्प होऊ शकतो, पण तसे करण्यास आम्हाला भाग पाडू नका असा अप्रत्यक्ष इशारादेखील निरूपम यांनी दिला.
उत्तर भारतीय लोक क्षेत्रीय मानसिकतेचे नाही तर राष्ट्रीय मानसिकतेचे
असतात. गुजरातमध्येही उत्तर भारतीयांवर हल्ले होत आहे. आज पंतप्रधानांच्या
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांना मारले जात आहे. एक दिवस मोदींनाही वाराणसीला
जायचे आहे, (निरूपम मोदी).
प्रतिक्रिया : ‘संजय निरूपम यांनी उगाच मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांमध्ये वाद निर्माण
करू नये. याचा काँग्रेसला कोणताही फायदा होणार नाही आहे. याउलट त्यांना
मराठी भाषकांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते. मुंबईसाठी उत्तर
भारतीयांचे योगदान मोठे आहे. मात्र त्यांनी काम बंद केल्याने मुंबई ठप्प
होईल हे मान्य नाही’.(रामदास आठवले
)