योग्य उच्चारासाठी अजून थोडे पण फार महत्त्वाचे.....
मराठीत अनुस्वार फार महत्त्वाचा आहे...
एक छोटासा टिंब शब्दाचा अर्थ पूर्ण बदलू शकतो...
जरा अनुस्वारासंबंधी...अनुस्वार असलेल्या शब्दाचा उच्चार कसा करावा याबाबत सोप्या भाषेत विवेचन...
ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्यापुढील अक्षर कोणते आहे त्यावर उच्चार कसा होईल ते ठरते.
उदा...
व्यंजनांंतील *पहीली ओळ*
ओळीतील अंतिम अक्षर ठरवते की कसा उच्चार होईल
क ख ग घ (ङ)
अंक=अ+ं+क=अ+ङ्+क= अङ्क,पंख(पङ्ख),रंग(रङ्ग),शंख(शङ्ख)
(इथे ङ चा उच्चार हा वाङमय-वांग्मय वा दिङमूढ-दिग्मूढ यासारखा होतो)
*दुसरी ओळ*
च छ ज झ (ञ)
पंच=प+ं+च=प+ञ्+च=पञ्च/पंछी-पञ्छी/अंजली-अञ्जली
*तिसरी ओळ*
त थ द ध (न)
अंत=अ+ं+त=अ+न्+त=अन्त,सन्थ,मन्द,अन्ध
*चौथी ओळ*
ट ठ ड ढ (ण)
उंट=उ+ं+ट=उ+ण्+ट=उण्ट/कण्ठ/बण्ड/पण्ढरी
*पाचवी ओळ*
प फ ब भ (म)
पंप=प+ं+प=प+म्+प=पम्प/बम्ब/सुम्भ
*शेवटची ओळ*
इथे नियम थोडा वेगळा आहे...
य र ल व श स ह क्ष ज्ञ
*य*
संयम=स+ं+य+म=स+य्+य+म=सय्यम
*ल*
संलग्न=स+ं+ल+ग्न=स+ल्+ल+ग्न=सल्लग्न
*र* *व* *श* *स* *ह* *क्ष* *ज्ञ* साठी अनुस्वाराचा उच्चार *व्* असा होतो
संरचना=स+ं+र+चना=स+व्+र+चना=सव्रचना
संवाद=स+ं+वा+द=स+व्+वा+द=सव्वाद
संशय=स+ं+श+य=स+व्+श+य=सव्शय
संसार=स+ं+सा+र=स+व्+सा+र=सव्सार
सिंह=सि+ं+ह=सि+व्+ह=सिव्ह
संहिता=सव्हिता
संहार=सव्हार
संक्षिप्त=स+ं+क्षि+प्त=स+व्+क्षि+प्त=सव्क्षिप्त
संज्ञा=स+ं+ज्ञा=स+व
+ज्ञा=सव्ज्ञा
कृपया काही शंका असल्यास विचारावे....
योग्य उच्चार कसे असावेत यासाठी हा प्रपंच.....