युथ काँग्रेसच्या दिवसांपासून मी अंदमान निकोबारपासून ते लक्षद्वीपपर्यंत देशभरात प्रचार करत आहे. मला प्रचाराला बोलावणारे ९५ टक्के लोक हिंदू होते. मात्र गेल्या चार वर्षांत हा आकडा खाली घसरला असून ९५ वरून २० टक्क्यांवर आला आहे’.
‘याचा अर्थ काहीतरी चुकीचे घडत आहे. आज मला लोक प्रचारासाठी बोलवण्यास
घाबरत आहेत कारण त्यांना याचा मतांवर परिणाम होण्याची भीती वाटते. (जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद)
प्रतिसाद : भारतीय जनता पक्षाने (भाजपा) गुलाम नबी आझाद
यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांनी हिंदूंचा अपमान केला असल्याची
टीका केली आहे.
२. हीच काँग्रेस
पक्षाची खरी समस्या आहे. त्यांनीच हिंदू दहशतवाद निर्माण केला आणि आता
त्यांचे प्रचारतंत्र त्यांच्यावरच उलटले आहे’.(सुब्रह्मण्यम स्वामी)