अनुस्वार केवळ ङ्, ञ्, ण्, न्, म् या नासिक्य वर्णांबद्दलच येत नाहीत, मराठीत अनुस्वाराचे आणखीही काही  वेगळे उच्चार आहेत, ते असे ---

अर्ध‌अनुनासिक उच्चार : हं, हूं, अं, टपालहंशील, मांसाहेब, केलें, झालें, गेलें, शब्दांत, आम्हांला, गेलां(त) (कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनियां बाबा गेलां),  बायकांत (बालिश बहु बायकांत बडबडला! - मोरोपंत)  वगैरे शब्दांतले अनुस्वार ङ्, ञ्, ण्, न्, म् हे उच्चार सांगत नाहीत.
झालं, गेलं, विसरलं ह्या बोली भाषेतल्या शब्दांतले अनुस्वार ङ्, ञ्, ण्, न्, म् हे उच्चार सांगत नाहीत.
संयम, संरक्षण, संलग्न, संवाद, संशय, विसंवाद, हंस आदी शब्दांतले अनुस्वारही ङ्, ञ्, ण्, न्, म् हे उच्चार सांगत नाहीत.

थोडक्यात काय, तर अनुस्वांरांचे काम फक्त नासिक्य वर्णांची जागा घेणे हे नाही, तर त्यांचे इतरही काही उपयोग आहेत.  . SMR