क्रियाविशेषण अव्यये ही इतर शब्दांपासून वेगळी ओळखू यावीत, म्हणून त्यांच्या अंत्याक्षरावर अनुस्वार देण्याची पद्धत होती.  उदा०  :

१.  का - प्रश्नवाचक उद्गाराच्या शेवटी येणारे अव्यय.  उदा० तू जाशील का?;   मी का तू?
२. कां -  (क्रियाविशेषण अव्यय) - उदा० कोणत्या कारणाने? व्हाय? तू कां जाशील?

१. मागे - (क्रियापद, मूळ धातू 'मागणे'चे रीति वर्तमानकाळातले तृतीय पुरुषी एकवचनी रूप) . न मागे तयाची रमा होय दासी;  माधुकरी घरोघरी अन्न मागे आणि पोट भरे.
२. मागें - ( शब्दयोगी अव्यय) पाठीमागे, नंतर.  उदा० माझ्यामागें कोण उभा आहे?  त्यांच्यामागें घरचे कोण पाहील?
( क्रियाविशेषण) . मागच्या बाजूस (जाणे/हटणे, वगैरे)  उदा० शत्रू मागें फिरला.

शब्दांच्या नपुंसकलिंगी रूपांच्या अंत्य एकारावर अनुस्वार असे.
उदा० तें (इट्);  ते (तोचे अनेकवचन-इंग्रजीत दे)

तृतीयेच्या रूपावरील शेवटच्या अक्षरावर अनुस्वार असे. उदा० मी (प्रथमा विभक्ती) जाईन, मीं (तृतीया विभक्ती) गेलो/गेले.

व्युत्पत्तीने सिद्ध होणारे अनुस्वार. उदा० नांव (मूळ संस्कृत शब्द नाम-त्यात शेवटी म हा नासिक्य वर्ण आहे, म्हणून नां-वर अनुस्वार);
नाव (अर्थ होडी. मूळ संस्कृत शब्द नौका-त्यात शेवटी नासिक्य वर्ण नाही, म्हणून ना-वर अनुस्वार नाही. )

असेच शब्द : पांच (मूळ पंच); पाच (अर्थ पाचू); घांट (अर्थ घंटा)-घाट (डोंगरी रस्ता; नदी किनारी बांधलेला कट्टा);

गहूं (मूळ गोधूम); आंवस (मूळ अमावस्या); जांवई (मूळ जामातृ); सांवळा (मूळ श्यामल); चांफा (मूळ चंपक)

वगैरे वगैरे.

हिंदी-गुजराथी-मारवाडी-मैथिली आदी भाषांनी अर्ध‌अनुस्वारित अनुस्वार गाळायचा दळभद्रीपणा केला नाही. उदा० हँसी,  हूँ‍....मोढूं, पहेरवुं वगैरे.

.