अमृतसरमध्ये रावण दहनाच्या वेळी झालेल्या ट्रेन अपघातात ६१ लोक मारले गेले तर ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या घटनेसारख्या घटना घडतच असतात. पंजाबमधल्या रस्त्यांवर अशा दुर्घटना दररोज होतात आणि त्यांत लोक मरतात. त्यात विशेष काही नाही.

दर दुसऱ्या दिवशी पंजाबमध्ये अपघात होतात. देशातही त्याचप्रमाणे अपघात होतात. ज्यामध्ये अनेक कुटुंबे मारली जातात. रावण दहनाच्या वेळी जो अपघात झाला त्याला काही वेळातच जास्त महत्त्व मिळाले म्हणून अनेक लोक तिथे पोहचले आणि प्रसारमाध्यमे होती म्हणून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली इतकेच . पंजाबमध्ये असे अपघात होणे काही मोठी गोष्ट नाही.  (सुखपालसिंग खारिया)