मित्रपक्ष ‘एमआयएम’प्रमाणे ‘वंदे मातरम्’ला आमचाही विरोध आहे (प्रकाश आंबेडकर)
प्रतिसाद : जीनांचा आत्मा सध्या मियाँ
ओवेसी यांच्या शेरवानीत घुसला आहे, पण त्यांच्या शेरवानीच्या नाडीत प्रकाश
आंबेडकर यांची मान अडकली असल्याने तेदेखील मुस्लिम लीगचीच भाषा बोलत आहेत. सध्या प्रकाश आंबेडकरांचा ‘निकाह’ एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्याशी झाला
असून त्यामुळे त्यांना राष्ट्रविरोधी झटके येऊ शकतात. पण प्रकाश आंबेडकर
आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. या देशात वंदे मातरम् म्हणावेच लागेल.
वंदे मातरम्’ला ओवेसी ‘उरूस’ मंडळाचा विरोध समजण्यासारखा आहे. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता देशातील मुसलमान ‘वंदे मातरम्’चे गान करीत आहेत. ‘वंदे मातरम्’ला आंधळा विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात हा ‘प्रकाश’ पडेल का हा प्रश्नच आहे. वंदे मातरम्’ म्हणजे मातृभूमीला वंदन. तसे करण्यासाठी येथील मुसलमानांना ओवेसी किंवा प्रकाश आंबेडकर यांना विचारण्याची आवश्यकता नाही.
ओवेसी यांच्या नादाने प्रकाश आंबेडकरांनी स्वतःचे जे अधःपतन करून घेतले असून आंबेडकरी समाज त्यांना माफ करणार नाही. बाबासाहेबांना जे कधीच मान्य झाले नसते असे ‘जीना छाप’ राजकारण प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केले आहे.