डिपिपि जरी खूप प्रभावी खरीद प्रक्रिया असली तरी त्यात . . . दोष आढळू शकतात. . . . भ्रष्टाचार कधीकधी डोके वर काढू शकतो. . . . आपल्या देशाच्या नैतिक मूल्यांचा एकूणच र्हास हे कारण . . . कोणतीही प्रक्रिया जर मनुष्य ठीक नसेल तर चालू शकत नाही. . .
संजयजी,
तत्वज्ञान फार छान आहे. पण पुढे काय?
1: देशात नैतीक मूल्ये जी काही आहेत, ती आहेत. ही मूल्ये इतक्या सहजासहजी तर बदलणार नाहीत. मग काय करायचे? मूल्ये बदले पर्यंत शस्त्रास्त्रे खरेदी करायचीच नाहीत? बोफोर्स नंतर जवळ पास तेच होत आहे. एकेका निर्णया करता पंधरा किंवा अधिक वर्षे. तुमची भूमिका तशी असेल तर स्पष्ट लिहा, की जो पर्यंत मूल्ये बदलणार नाहीत, किंवा भ्रष्टाचार होत नाही याची शंभर टक्के खात्री नाही, तो पर्यंत शस्त्रास्त्रे खरेदी करायचीच नाहीत. त्याचे जे काही परिणाम होतील ते तुम्हाला मान्य आहेत. तसे स्पष्ट लिहा.
2: भ्रष्टाचार न होऊ देता खरेदी व्हावी म्हणून काही उपाय मोदी सरकार राबवीत आहे. तुमच्या कडे काही वेगळ्या व जास्त प्रभावशाली उपाय / कल्पना आहेत का? असतील, तर काय ते सांगा.
3: समजा तुमच्या कोणी जवळच्या नातेवाइकाला किंवा मित्राला हृदयरोगाचा त्रास आहे असे निदान झाले, व डॉक्टरांनी अंजियोप्लास्टी करायला सांगितली. आता, अंजियोप्लास्टीत गुंतागुंत होवून म्रुत्युची शक्यता 2% आहे; भ्रष्टाचाराची शक्यता तर आहेच - 20,000 रु मिळणाऱ्या स्टेन्टची किंमत अनेक रुग्णालये 80,000 लावतात; एका स्टेन्ट ने भागणार असेल तरी दोन स्टेन्ट लावतात; वगैरे, वगैरे. अश्या वेळी तुम्ही काय करता? अंजियोप्लास्टीचे धोके, व भ्रष्टाचाराची शक्यता; हे सर्व तत्वज्ञान उपस्थितांना सांगता? व सांगितले, तरी पुढे काय? अंजियोप्लास्टी करायची, का नाही करायची? काय सल्ला देता?