लक्षात राहणं किंवा विसरणं ही मेंदूची प्रक्रिया आहे आणि आपण त्या प्रक्रियेचे जाणते आहोत.  आठवत नाही हा स्मृतीचा भाग झाला, पण आठवत नाही हे ज्याला कळतंय ते आपण आहोत. माझे लेख वाचकांना स्वतःप्रत आणतात त्यामुळे त्यांचं स्मृतीरेखाटन होऊ शकत नाही.  म्हणजे लेख वाचल्यावर तुम्ही आनंदी होऊ शकता पण नक्की कशाचा आनंद झाला  हे सांगता येत नाही कारण आनंद निष्कारण आहे. 

स्वतःशी जोडलं जाणं ही बाय डिफॉल्ट स्थिती आहे, त्यासाठी परिश्रमाची गरज नाही इतकंच मी सांगायचा प्रयत्न करतो त्यामुळे लेखन सोपं होतं.