का देउ नये रिलायन्स ला?  एकूणच, मोदी काही बोलले नाहीत तर तुम्ही म्हणणार "ते उत्तर देत नाहीत". जेटली यांनी सविस्तर उत्तरे दिली, तर तुम्ही त्या कडे दुर्लक्ष करणार. Cynical शेरेबाजी कराण्यात तंत्रज्ञान तर नसतेच, पण काही फारसा विचार पण करावा लागत नाही. तुमचे "विचार" वाचून मला गोरे काकांची आठवण येते.

काळे काका आणि गोरे काका यांच्या बद्दल एका मानसशास्त्राच्या पुस्तकात वाचल होत. एक मुलगा बीटेक पास होतो. कॅम्पस प्लेसमेंट मधूनच त्याला चांगली नोकरी पण मिळते. त्याचे दोन शेजारी, काळे काका आणि गोरे काका. तो त्याना पेढे द्यायला जातो. त्यांचं संभाषण होत ते, काहीस अस.

मुलगा - काका, पेढे.
काळे काका - अरे वा, कशाबद्दल ?
मुलगा - मी बीटेक पास झालो
काळे काका - फार छान. मग आता काय विचार आहे? एमटेक करणार का लगेच नोकरी?
मुलगा - काका नोकरी पण मिळाली. कॅम्पस प्लेसमेंट मधूनच.
काळे काका - वा. नशीबवान आहेस. कोणती कंपनी?
मुलगा - मोठी मल्टी-नॅशनल कंपनी आहे
काळे काका - उत्तम. बघ, चार वर्षे चांगली मेहेनत केलीस, त्याच फळ शेवटी मिळाल. मल्टी-नॅशनल कंपनी म्हणजे पगार चांगला असणारच. पोस्टिंग कुठे? इथे पुण्यातच का बाहेरगावी?
मुलगा - काका पोस्टिंग बंगलोरला असणार आहे, पण आधी तीन महीने बॅंगकॉकला ट्रेनिंग आहे.
काळे काका - वेरी गुड. आयुष्याच्या सुरुवातीलाच परदेश वास्तव्याचा कामाचा अनुभव तुला नंतर खूप उपयोगी पडेल. एक धोक्याची सूचना देऊ का? बॅंगकॉक शहर अस आहे की तिथे वाईट सवई लागण खूप सोप आहे. तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर उत्तम संस्कार केले आहेत आणि तू काहीही चुकीच करणार नाहीस याची मला खात्री आहे, पण जरा काळजी घे, येवढच. ऑल द बेस्ट.


काळे काकांना वाकून नमस्कार करून तो मुलगा गोरे काकांकडे जातो.

मुलगा - काका, पेढे.
गोरे काका - हं, काय दिवे लावलेत?
मुलगा -  मी बीटेक पास झालो
गोरे काका - फार छान. पण हल्ली काय गल्लोगल्ली इंजिनियर झाले आहेत. परवाच वर्तमान पत्रात वाचल, शिपायच्या नोकरी करता बीई, एमबीए यांचं अर्ज आले होते. मग आता काय विचार आहे? नुसता बसून राहण्या ऐवजी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज मध्ये नाव तरी नोंदवा. 

मुलगा - काका नोकरी पण मिळाली. कॅम्पस प्लेसमेंट मधूनच.
गोरे काका - अस का? कोणती कंपनी?
मुलगा - मोठी मल्टी-नॅशनल कंपनी आहे
गोरे काका - मल्टी-नॅशनल कंपनी म्हणून हुरळून जाऊ नकोस. यांचं "हायर अँड फायर" असे धोरण असत. नोकरी आज आहे तर उद्या असेल का याची शाश्वती नाही. आणि काम मात्र मर-मर करून घेतात. असो, पोस्टिंग कुठे? इथे पुण्यातच का बाहेरगावी?
मुलगा - काका पोस्टिंग बंगलोरला असणार आहे, पण आधी तीन महीने बॅंगकॉकला ट्रेनिंग आहे.
गोरे  काका -छान. एक तर ते बॅंगकॉक शहर म्हणजे व्यसनांच माहेरघर. त्यातून तुम्ही मल्टी-नॅशनल कंपनीत नोकरीला, म्हणजे पगार चांगला असणारच. जगाचा काहीही अनुभव नसताना खिशयात पैसे आणि बॅंगकॉक मध्ये वास्तव्य म्हणजे "आधीच मर्कट, तश्यात मद्य प्यायला". बर, आता तुम्ही बॅंगकॉकला जाणारच, तर एक मेहेरबानी करा.  तुमच्या आई-वडिलांनी तुम्हाला येथे पर्यन्त पोहोचविण्या करता अपर कष्ट घेतले आहेत हे ध्यानात ठेवा, आणि त्यांना पश्चाताप होईल असे वागू नका म्हणजे झालं.