तुम्हाला गोरे काकांचा किस्सा कळेल अशी अपेक्षाच नव्हती. काळे काका आणि गोरे काका हे अनुक्रमे सकारात्मक आणि नकारात्मक + सिनिकल दृष्टीकोणाचे प्रतीक आहेत. एक मुलगा पेढे घेऊन आला, तर त्याला अरे वा, कशाबद्दल ? असे विचारता येते, किंवा हं, काय दिवे लावलेत? असेही विचारता येते. काय विचारणार हे तुमच्या मनोवृत्ती वर अवलंबून आहे॰ त्या पुढे, तुमची मनोवृत्ती काय, हे तुम्ही काय विचारता त्या वरुन दिसून येते.
जसे तुमचा शेरा "मुळात किक-बॅकसाठी कोणत्याही विषेश तंत्रज्ञानाची गरजच नसते, ते केवळ दिखाव्याचे डील असते ( त्याला सेट-ऑफ असं ऑफिशियल नांव आहे ! )." काय माहीती आहे तुम्हाला राफेल करारातील सेट-ऑफ बाबत? रिलायन्स किंवा जो कोणी असेल, तो नेमके काय करणार आहे; विमानातील एवियोनिक्सचा एकादा भाग बनविणार आहे, का विमानात चढायची शिडी बनविणार आहे? हे तुम्हाला, किंवा कोणालाही, माहीत असणे शक्यच नाही. कारण ते अजून नक्की काय ते ठरलेलेच नाही. पण हे माहीत होई पर्यंत थांबण्याची गरजच काय? एकदा का सिनिकल दृष्टीकोण अंगीकरला, की प्रत्येक प्रयत्नाची फक्त टर उडवीत राहणे, या पेक्षा सोपे दुसरे काहीही नाही.