संजयजी,
समजा केंद्र सरकारने मला काही कामा करता सल्लागार म्हणून नेमले. मी माझे चार्जेस सांगितले. त्यात अर्थातच माझी काम करण्याची फी, जाण्याऱ्येण्याचा विमानाचा खर्च, दिल्लीला हॉटेल मध्ये राहण्याचा खर्च, माझा रिपोर्ट तयार करण्या करता स्टेनोचा खर्च, छपाईचा खर्च, इत्यादी अनेक कंपोनेंट होते. सरकार म्हणाले तुमची फी आम्ही मान्य करू, मात्र एक अट असेल. मी पुणे-दिल्ली-पुणे प्रवास फक्त एयर इंडिया याच विमानाने करायचा, व दिल्लीला ITDC च्या (म्हणजे सरकारी) "जनपथ" या हॉटेल मध्येच राहायचे. यात कुठे भ्रष्टाचार किंवा किक-बॅक आहे ?