तुम्ही समजता तेवढं हे प्रकरण साधं नाही. मोदी पूर्णपणे गोत्यात आले आहेत आणि बहुदा त्यांना पुढच्या महिन्यात पद सोडावं लागेल.
एकाद्या गोष्टीला पाठिंबा देण्यात धोका असतो. ज्याच्या पाठीशी आपण उभे राहिलो ते चुकिचे निघाले तर? आपली चूक मान्य करावी लागते.
पण नकारात्मक आणी सिनिकल भूमिका घेण्यात हा धोका नसतो, उलट एक छान सोय अशी असते, की पुढे काहीही झाले तरी आपली भूमिका कधीच चुकिची होत नाही. जसे, समजा खरोखर असे घडले की मोदींना लवकरच पद सोडाव लागल, तर "बघा, मी सांगितल होत ना, की बहुदा त्यांना पुढच्या महिन्यात पद सोडावं लागेल. ". आणी समजा तस काहीही झालं नाही, तर "आपल्या देशात राजकारण्यांना लाज नसतेच. तिकडे जपान मध्ये जसे शिंझो एबे यांनी राजीनामा दिला, तसे आपल्या कडे होणे शक्य नाही."
समजा सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरण पुढे नेले, तर "बघा, मी सांगितल होत ना, की तुम्ही समजता तेवढं हे प्रकरण साधं नाही." आणी समजा सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण गुंडाळाले, तर "हे होणारच होते. अहो सर्वोच्च न्यायालयाकडे स्वता:ची तपास यंत्रणा नसते. तपास सीबीयायलाच करायचा असतो. अणी सीबीआय हे तर सरकारच्या हातातले बाहुले आहे. तेव्हां पुढे प्रगती होणे शक्यच नव्हते".
समजा 2019 निवडणूकात भाजपा हरली, तर "पाहिलत? चेतन पंडित/ रणजीत चितळे यांना ओफसेट म्हणजेच किकबॅक हे कळत नसले, तरी जनता सूज्ञ आहे. ये जो पब्लिक है ना, ये सब कुछ जानती है." आणी समजा परत भाजपाचा जय झाला तर, "चेतन पंडित/ रणजीत चितळे सारख्या सुशिक्षित लोकांना ओफसेट म्हणजेच किकबॅक हे कळत नाही, तिथे इतर जनतेची काय कथा?"
चालू द्या.