मोदींनी घोटाळा केलायं यात वाद नाही पण मी उपस्थित केलेल्या मुद्यांना तुम्ही उत्तर दिलं नाही

१) ओलाँदनी आपलं विधान मागे घेतलेलं नाही.
२) सुप्रिम कोर्टानं किंमतीची आणि ऑफसेट पार्टनरच्या निवडीची विचारणा केली आहे. तीचं उत्तर मोदींना ११ तारखेपर्यंत द्यायचं आहे.
३) राकेश अस्थाना या भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी मोदींनी बेकायदा बदली सत्र सुरू केलं आहे. आलोक वर्मांची बदली तर रात्री २ वाजता करण्यात आली  आणि त्या अधिकाऱ्यांनी (आलोक वर्मा आणि ए के बस्सी) सुप्रिम कोर्टात अर्ज दाखल केले आहेत.  याचा अर्थ मोदींना सिबीआयच्या चवकशीची दहशत आहे.  सगळं स्वच्छ असतं तर त्यांनी अशाप्रकारे हस्तक्षेप करण्याची गरजच नव्हती.
४) मी पहिल्यापासनं एकच म्हणतोयं की प्रश्न डिपीपी किंवा ऑफसेटच्या  तांत्रिक प्रोसिजरचा नाही तर आर्थिक घोटाळ्याचा आहे. 
५) तुमचे लेख मोदी समर्थनार्थ आहेत, तर मग वरील मुद्यांच्या अनुषंगानं तुमचं म्हणणं काय आहे ? मोदी पदच्युत झाल्यावर तर या लेखातल्या तांत्रिकबाबी केवळ माहिती म्हणून उरतील पण तत्पूर्वी एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता ?