निर्गुण आणि निराकार असलेले ब्रम्हं हेच सत्य आहे, याची पुरेपुर जाणीव  ज्ञानीजनांना आहे. 

परंतु सर्वसामान्यांना श्रद्धा आणि भक्ती साठी सगुण साकार स्वरूपाची जरूरी असते. आणि म्हणून त्यांच्याकरता भजन, किर्तन, पूजा, अर्चना या सगळ्यांची आवश्यकता भासते. 
तसेच हे सारे करताना जनसमुदाय एकत्र जमतो, विचारांचे अदान-प्रदान होते आणि एकोपा वाढतो. अनेकांनी एक विशिष्ठ जीवन पद्धती स्विकारल्याने समाजजीवनाला स्थैर्य येते.  म्हणून या सर्वाचे महत्त्व आहे. समर्थांनी त्याबाबींचे सविस्तर विश्लेषण केलेले आहे. 

परंतु हे खरे आहे, की जेव्हा कर्मकांडांना अवास्तव महत्त्व दिले जाते, आणि ते करण्यामागचा हेतू दुर्लक्षिला जातो तेव्हा ती नुसती निरुपयोगीच नाही तर  अनेकदा घातक ठरतात.