मी पहिल्यापासनं सांगतोयं आणि तुम्ही ३४/३५ लेखांनतर, आता म्हणतायं   निर्गुण आणि निराकार असलेले ब्रम्हं हेच सत्य आहे, याची पुरेपुर जाणीव  ज्ञानीजनांना आहे. 

याचा अर्थ आधीचे सर्व लेख वाचकांची दिशाभूल आहे आणि तुम्ही माझ्या प्रतिसादांना दिलेली सगळी उत्तरं व्यर्थ आहेत. आता नीट वाचा म्हणजे तुम्हालाही उलगडा होण्याची शक्यता आहे.

ज्याला निराकाराचा उलगडा झालायं त्याला त्याबरोबरच हा ही उलगडा होतो की साधक स्वतःला व्यक्ती समजतोयं तो केवळ समजूतीचा घोटाळा आहे.  त्यामुळे तो तुम्ही म्हणतायं  तशा  भानगडीत तो पडतच नाही !

" परंतु सर्वसामान्यांना श्रद्धा आणि भक्ती साठी सगुण साकार स्वरूपाची जरूरी असते. आणि म्हणून त्यांच्याकरता भजन, किर्तन, पूजा, अर्चना या सगळ्यांची आवश्यकता भासते. तसेच हे सारे करताना जनसमुदाय एकत्र जमतो, विचारांचे अदान-प्रदान होते आणि एकोपा वाढतो. अनेकांनी एक विशिष्ठ जीवन पद्धती स्विकारल्याने समाजजीवनाला स्थैर्य येते.  म्हणून या सर्वाचे महत्त्व आहे. समर्थांनी त्याबाबींचे सविस्तर विश्लेषण केलेले आहे. "

देव ही संकल्पनाच मुळात एक चुकीची धारणा आहे. एकदा तुम्ही राम मध्ये आणला की रहीम येणार  दत्त येणार, शंकर येणार, गणपती येणार, मग  स्त्रीयांना संधी हवी म्हणून दुर्गा येणार, कालीमाता येणार, लेटेस्ट संतोषी माता येणार,  त्यांच्या पाठोपाठ  जिजस येणार, मोझेस येणार, मग जैनांचे तिर्थंकर येणार..... आणि आता झाला आहे तसा सगळा राडा होणार.  देशात गरीबी आहे, बेरोजगारी आहे, लोकसंख्या वारेमाप वाढतेय, भ्रष्टाचार फोफावलायं  आणि लोकांना काय हवंय तर राममंदीर !  कुणामुळे हा समाज निर्बुद्ध बनला आहे ? जरा विचार करा. लोकांना शांतता आणि आनंद हवा आहे आणि आम्ही हिंदुत्व विरुद्ध इस्लाम (राम वर्सेस रहीम) या मूर्ख विवादात पडलो आहोत. 

समर्थांना निराकाराचा उलगडा झाला असता तर त्यांनी स्वतःला रामदास ही उपाधी लावूनच घेतली नसती. त्यामुळे ३४ लेखांनंतर आता निराकारची भाषा म्हणजे निव्वळ एकीव माहितीवरून केलेली फेकाफेक वाटते.