शबरीमाला मंदिराची परंपरा आणि रितीरिवाज वाचवण्याच्या नादात आरएसएसचा एक नेता - वल्सान थिल्लानकेरी - व मंदिर बोर्डाचा एक अधिकारी पी शंकरदास  हे पूजेच्या साहित्याशिवाय मंदिराच्या १८ पायऱ्या चढले.. परंपरेच्याविरोधात जाऊन दोघांनी हे कृत्य केल्यामुळे शबरीमाला भक्तांनी संताप व्यक्त केला आहे..शबरीमाला मंदिराच्या गर्भगृहात जाताना पूजेची साहित्य घेऊन जाण्याची पंरपरा आहे. महत्त्वाचे म्हणजे अत्यंत वेगाने या १८ पायऱ्या चढाव्या लागतात.

दरम्यान शबरीमाला मंदिराचे तंत्री कंडारारु राजीवरु यांनी सांगितले आहे की, फक्त तंत्री आणि पूर्ववर्ती पंडालम शाही परिवाराचे सदस्य पुजेचे साहित्य न घेता पायऱ्या चढू शकतात. परंपरेचे उल्लंघन केल्यामुळे आता मंदिराचे विशेष शुद्धीकरण करण्यात येणार आहे.