मुस्लिम संस्कृतीशी संबंधित असलेल्या शहरांची नावे बदलण्याचा उद्योग
सध्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सुरू केला आहे. यावर प्रतिक्रिया
देताना येथील भाजपा आमदार संगीत सोम यांनी एकेकाळी भारतावर राज्य करणाऱ्या
मुघलांवर तोफ डागली आहे. मुघलांनी भारतातली हिंदू संस्कृती नष्ट करण्याचे
काम केले होते, असे विधान त्यांनी केले आहे. एक नवाब मुझफ्फर अली याने
आपल्या शहराचे नाव मुझफ्फरनगर असे ठेवले होते, ते बदलून आम्ही लक्ष्मीनगर करणार आहोत. (संगीत सोम)