जर तेलंगणामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर हैदराबाद व अन्य शहरांची नावे बदलून थोर व्यक्तींची नावे ठेवण्यात येतील असे आश्वासन भाजपाचे नेते राजा सिंग यांनी दिले आहे. "भाजपचे सरकार तेलंगणात जर सत्तेत आले तर आमचे पहिले प्राधान्य विकासाला असेल. तर दुसरे प्राधान्य हे शहरांची नावे बदलण्याला असेल. (राजा सिंग)

प्रतिसाद : अशी डायलॉगबाजी केल्याने मते मिळतील असे राजा सिंग यांना वाटत असावे. मी स्वत: हैदराबादी आहे आणि आम्हाला स्वत:ला हैदराबादी म्हणून घेण्यात गर्व वाटतो. राजा सिंग कोण आहे? जर त्यांना हैदराबाद नावाबद्दल आक्षेप आहे तर त्यांनी आधी स्वत:चे नाव बदलावे. त्यांच्या नामांतरणाला कोणाचा विरोध नसेल.सिंग यांनी नामांतरणाचा प्रयत्न केल्यास त्यांच्या अडचणी वाढतील. आमची ओळख,असलेल्या शहराचे नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास सिंग यांना खूप त्रास सहन करावा लागेल. (रेणुका चौधरी)