पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमणसिंह यांनी छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. याउलट आऊटसोर्सिंगमुळे बाहेरच्या प्रदेशातील लोकांना छत्तीसगडमध्ये रोजगार मिळाला. निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आऊटसोर्सिंगची कामे बंद करुन रिक्त पदे भरली जातील आणि स्थानिकांनाच रोजगार दिला जाईल. (राहुल गांधी )