गेल्या काळाचा हा तुकडा चित्रदर्शी भाषेने मखमली झाला आहे. काय आणि किती लिहावे यापेक्षा कुठे थांबावे हे लेखकाला कळणे गरजेचे असते. कमीत कमी शब्दांत, काही सूचक संदर्भ अधांतरी ठेवून नेमक्या समेवर कथा संपवणे हे लेखकाचे सामर्थ्य त्याच्या आधीच्या लिखाणातून दिसलेच आहे. त्या लिखाणाला साजेशी कथा.