महिलांनी नाईटी’ घालून सार्वजनिक ठिकाणी कपडे धुणे, किराणा दुकानांत जाणे किंवा सभा-बैठकांना जाणे चांगले नाही, स्त्रियांचा ‘नाईटी’ हा पोशाख रात्री वापरण्याचा असल्याने त्याचा वापर फक्त रात्रीच करण्याचा आणि याचे उल्लंघन करणाऱ्या महिलेला दंड करण्यात येईल. नाईटी’ घालण्यासाठी सायंकाळी ७ ते सकाळी ७ अशी वेळ ठरविण्यात आली आहे. जी महिला याखेरीज इतर वेळी नाईटी’ घातलेली आढळेल तिला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. (आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील टोकळापळ्ळी  गावाच्या सरपंच फँटेशिया महालक्ष्मी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नऊ जणांच्या समितीचे सभासद)