युबंटू लाईव्ह सीडीची
नवीन आवृत्ती आता उपलब्ध आहे. युबंटूच्या १८.०४ या व्हर्जनमध्ये मराठीसाठी अनुकूल बदल करून बनविलेल्या नवीन युबंटूला "रिमास्टर" असेही म्हणतात. यात लिबर ऑफिसचा स्पेल चेक व फायरफॉक्सचे मराठी स्पेल चेक ऍड ऑन अर्थात आहेच. Audacity आणि GIMP ही मूळ युबंटूत नसलेली सॉफ्टवेअर यात आधीच टाक़ून ठेवलेली आहेत.
त्याव्यतिरिक्त दोन मुख्य सुधारणा केल्या आहेत.
१) यशोमुद्रा, जैनी, लैला यासारखे अनेक युनिकोड फॉन्ट
२) मराठी / इंग्लिश दोन्ही भाषेत सहज टाईप करता यावे म्हणून F9 ही टॉगल की ऍड केली. "प्रमुख" सॉफ्टवेअरमध्ये F9 हीच की वापरली आहे. म्हणून युबंटूमध्ये देखील तीच ठेवली.
वर दिलेली फाईल डाऊनलोड करून घ्या. याची साईज खूप मोठी आहे. (सुमारे दोन जी.बी. ) त्यानंतर "निरो" या सॉफ्टवेअरमध्ये "Burn Image to Disk" असा ऑप्शन वापरून युबंटूची सी.डी. तयार करा. ही सी.डी. कोणत्याही कॉम्प्युटरमध्ये टाकून तो सुरू केला की विंडोजच्या ऐवजी युबंटू सुरू होईल. सिडी काढून कॉम्प्युटर परत सुरू केला की पुन्हा विंडोज. याला लाईव्ह सिडी असे म्हणतात. याची चर्चा उपक्रमाच्या
या पानावर वाचता येईल. कोणाला जर याचा सोर्स कोड पाहायचा असेल तर तो
येथे उपलब्ध आहे.